भारतीयांना येथे प्रवेश नाही

आज टाईम्स मध्ये एक ब्लॉग वचला..

बातमी..

हॅगन डॅज्स या आईस क्रीम बनवणाऱ्या कंपनीने त्यांचे पहिले भारतातले आउटलेट दिल्ली येथे उघडले. तेथे फक्त आंतरराष्ट्रीय पासपोर्ट असणाऱ्यांनाच प्रवेश असा बोर्ड लावण्यात आला होता.

ही बातमी टाईम्स मध्ये आल्यानंतर केवळ हा बोर्ड बदलून प्रकरण मिटवण्यात आलं.

१) अशा कंपनीवर अधिकृत कारवाई व्हावी असं कोणाला वाटत नाही का?

२) शिवसेना, म. न. से. ह्यांनी तरी ह्याप्रकरणाच्या विरोधात आवाज उचलायला नको का?

३) मी "हॅगन डॅज्स" चं  आईस क्रीम खाणारं नाही.. पण ह्यापुढे जाऊन मी काय करू शकतो....?

"ह्या प्रश्नांची उत्तर माहीत असून जो देणार नाही.. त्याच्या डोक्याची सहस्त्र शकले होऊन पडतील... हा हा.. हा.."

संपूर्ण बातमी...

 दुवा क्र. १