तेंडुलकरची आरती...

(ही आरती, मला एका मित्राने पाठवली आहे, तिचा कवी अज्ञात आहे. पण सर्वांच्या आस्वादासाठी येथे देत आहे. सचिन-भक्तांना नक्की आवडेल)

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची!
अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची!
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची!
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची!
 
जय देव जय देव जय तेंडुलकरा!
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा!
जय देव जय देव..
 
१४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा!
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा! (इथे 'सर्व गोलंदाजांची जाहली शोभा' असे काहीसे हवे होते असे वाटते)
मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा!
धावांचा डोंगर उभा राहिला बघा!
जय देव जय देव जय तेंडुलकरा!
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा!
जय देव जय देव..
 
दुमदुमले मैदान झाला जल्लोष!
थरथरला गोलंदाज मानिला खेद!
कडाडली बॅट चेंडुचा शिरच्छेद!
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध!
जय देव जय देव जय तेंडुलकरा!
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा!
जय देव जय देव..
घालीन लोटांगण वंदिन चरणं!
डोळ्याने पाहिले द्विशतक तुझे!
पोस्टर लावूनी, आनंदे पुजीन!
भावे ओवाळीन, "सचिन" नामा!
 
त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव!
त्वमेव गावसकर, लारा त्वमेव!  (हे भारी आहे!!!)
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव!
त्वमेव क्षेत्ररक्षक, ऑलराउंडर त्वमेव! 
 
गुड लेंथ टाकले, यॉर्कर टाकले!
बाउन्सर टाकले, व्यर्थ सारे!
ड्राइव्स तू मारले, पुल तू मारले!
फ्लिक्स तू मारले, सार्थ सारे!
 
हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर हरे हरे!! ('जिंके' सचिन असे हवे होते )