साऱ्या कलहाचं एकमेव कारण : अध्यात्म२

मुळ लेख मालेच्या प्रवाहाला धरून मी  " प्रेम : एक  जुनाट दुर्धर गैरसमज " असा लेख टाकणार होतो , पण त्या आधी काही प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे वाटल्याने हा लेख लिहीत आहे .

१) येथील एका ज्येष्ठ साहित्यिकाने असा गैरसमज करून घेतला आहे की ही लेखमाला त्यांच्या लेखमाले विरुद्ध युद्ध म्हणून पुकारली आहे .
>>>   मी आधी म्हणल्या प्रमाणे माणुस हा मेंदू विकसीत झालेला एक प्राणी आहे , प्रत्येकाचाच मेंदू विकसीत असल्याने व्यक्ती तितक्या प्रकृती हे मान्यच आहे . त्यामुळे ही लेखमाला काय आहे हे आपला दृष्टीकोनच ठरवेल .
माझा स्वतःचा दृष्टीकोन असा आहे की एकांगी जाहीरातबाजी हे समाजाला फसवण्याचे कारस्थान आहे आणि म्हणून मी  नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे  बस्स  इतकेच !!

२)>> तुमची बहुदा अशी पंचाईत होते की मी म्हणतो त्यानी तुमच्या धारणा चूक ठरतात
आणि त्यामुळे आपण चूक आहोत असं तुम्हाला वाटायला लागतं,>>

मुळातच माझी लेखमाला " मी बरोबर " असा डंका पिटायला लिहीत नाहीये . तुम्ही बरोबर का मी बरोबर या पेक्षा कोणता विचार बरोबर हे जास्त महत्त्वाचे वाटते , माझी धारणा / विचार / लेखमाला चुक आहे हे आपण खणखणीत पुराव्यानिशी सिद्ध कराल तर मी  आपल्या पायापाशी बसण्यात धन्यता मानेन .
( मी आधी ही हा प्रश्न उपस्थित केला होता : परमहंस रामकृष्णांनी  " कट्टर नास्तिक " नरेंद्रला जसा पुरावा दिला तसा आपण देवू शकता का?? "  पण माझा प्रतिसाद प्रकाशित झाला नाही . कारण : अज्ञात )

३) युद्ध चुक की बरोबर  ? थोडासा विचार करून पाहा हा प्रश्नच निरथक आहे , युद्ध अनिवार्य आहे
( यावर स्वतंत्र लेख लिहायचा विचार आहे ) तुर्तास

 " जगात जशी चांगली माणसे आहेत तशीच वाईट माणसे ही आहेत हे सत्य नाकारता येत नाही त्या मुळे दीर्घ कालीन  शांतता राखण्या साठी अल्पकालीन  युद्धावाचून दुसरा पर्याय नाही " :- शांतता नोबेल पुरस्कार विजेते - बराक ओबामा .

४) मला सहसा मोठ्या ग्रंथांचा संदर्भ द्यायला आवडत नाही , पण आपण देव , गुरू हा विषय काढलाय म्हणून :  (माझ्यामाहीतीप्रमाणे ) सांख्यदर्शन जो की समुळ हिंदुतत्वज्ञानाचा पाया आहे यात कोठे ही देव , गुरू असा उल्लेख नाहीये , तो सर्वप्रथम योगदर्हनात येतो , तिथेही मार्गदर्शन करणारा गुरू  तोच देव  या अर्थाने !

५) तुम्ही एकतर माझं म्हणणं बेशर्त मान्य करा म्हणजे तुम्ही तुमच्या धारणातून
मुक्त व्हाल आणि मी किती सोपं आणि उघड सांगतोय ते तुमच्या लक्षात येईल
किंवा माझं वाचू नका म्हणजे तुमच्या धारणा कायम रहातील >>>
परत एकदा स्पष्ट करतो की येथे मी बरोबर की तुम्ही असा प्रश्न नाहीये ,  इंद्रीयअनुभव्य असे अधिभौतिक बरोबर की  कोणताही पुरावा न देणारे अध्यात्म ? हा प्रश्न आहे .
परत एकदा सांगतो , आपले मत आपण पुराव्यानिशी सिद्ध करू शकत असाल , जसे की श्रीमदाद्यशंकराचार्यांनी केले , परमहंसांनी केले , तर  आपले चरण धरून शिष्यत्व स्विकारण्यात मला आनंदच वाटेल !! ( शिवाय याच्या उलट झाले तर आपण माझे शिष्यत्व स्विकारावे असा माझा हट्ट नाही .)

६) अशा परिस्थितीत तुम्ही माझ्या लेखावर लेख लिहीण्यापेक्षा तुमचा स्वतंत्र
लेख लिहा आणि त्यात मांडलेल्या मतांवर शेवट पर्यंत टिकून रहा म्हणजे त्याचा
कुणाला तरी (किमान तुम्हाला तरी) उपयोग होईल >>>>

 हा सल्ला अत्यंत चुकीचा आहे असे नाही का वाटत आपणाला ??  मी  सत्याचा शोध घेतोय , आपण जर  रोखठोक पुराव्यानिशी सिद्ध केलेत की मी भरकटत आहे , अधिभौतिक असत्य आहे , तर मी  अंधकारात का धडपडत राहू ??   कोणी किती ही सांगीतल तरी मला मतांध व्हायला आवडणार नाही !

स्वतंत्र लेख लिहून मला स्वत:चा डंका पिटायची हौस नाही , मला फक्त चर्चा हवी आहे जी  योग्य मार्ग दाखवेल सत्याप्रत पोहोचण्याचा !!