साऱ्या कलहाचं एकमेव कारण : अध्यात्म

(खूप विचारांती हा लेख लिहायला घेतोय . हे विडंबन नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे . येथे कोणाचीही टर उडवण्याचा उद्देश नाही , फक्त योग्य मताच योग्य स्पष्टीकरण न दिल्यास समांतर सिद्धान्त कसे उभे राहातात याचे प्रात्यक्षित आहे . )

अध्यात्माचा साधा अर्थ आपण मुळात काय आहोत हे समजणे असा आहे.
  ही व्याख्या छान आहे मात्र त्याच्या नावा खाली अव्वाच्यासव्वा थापा खपवल्या जातात .
 आपण कोण आहोत या प्रश्नाच सरळ साध सोप्प उत्तर : मेंदू नावाचा एकमेव अवयव विकसीत झालेली अन त्या योगे स्वतःच अस्तित्व ( सरळ साध्या एक्झिस्टन्स या अर्थाने ) टिकवण्याचा प्रयत्न करणारी  प्राण्यांची प्रजाती !

(पहिल्याच घासाला ठसका लागल्या सारख झालं का कोणाला ??  स्वाभाविक आहे , आपल्या देशात लहानपणापासून   साध्या सोप्या गोष्टींऐवजी काहीच्या काही  शिकवले जाते अन आपण मतांध बनून तेच खर मानत राहतो . ) 

असो तर येथेच , पहील्यांदाच मी स्पष्ट करतो की   येथे फक्त ५ ज्ञानेंद्रीये   यांना अनुभवता येणारे अनुभव प्रमाण मानले जातील !  मन हे ज्ञानेद्रिय नाही  , ( ज्याला आहे असे वाटते त्यने ते दाखवावे अथवा ऐकवावे अथवा त्याचा अस्तित्वाचा ( सरळ साध्या एक्झिस्टन्स या अर्थाने ) पुरावा द्यावा! ) मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मेंदुच्या कोणत्या तरी कोपऱ्यात चालू असलेल्या रासायनिक प्रक्रियांची  प्रतिक्रिया .

आता निराकार : या विषयी : इथे मी जास्त बोलणार नाही , फक्त , पंच ज्ञानेद्रियांनी अनुभव सिद्ध केलेल्या विज्ञानाचे एक आव्हान देत आहे

 बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल !!

मुक्ती : जिथे मुळात आत्मा परमात्मा यांचे अस्तित्व अनुभवाने सिध्द करता येत नाही तिथे मुक्ती या शब्दाला अर्थच राहत नाही , फार फार तर मरण या शब्दाला काव्यात्मक समानार्थी शब्द म्हणता येइल.

 असो . काही महत्त्वाच्या व्याख्यांच खंडन केल्या नंतर मुळ विषयाचा आढावा घेवू .

साऱ्या कलहाचं एकमेव कारण : अध्यात्म !! हे कस ?

एक क्षण कल्पना करा अध्यात्म , परमात्मा , निराकार, मुक्ती , ब्लाहब्लाहब्लाह ( इ. इ. + फालतू  याअर्थाने ) गोष्टी नाहीयेत ,

तुम्ही फक्त "आहात" 
बस्स बाकी काही नाही .
आणि आता सगळ्याच गोष्टी सोप्प्या होतात . तुम्हाला फक्त हे " आहात " टिकवायचय 
( म्हणजेच त्याच "होतो" होवू द्यायच नाहीये .! )  
समोर आहे ते सगळ साकार , स्पष्ट , अनुभाव्य  आहे ! 
कुठेही उगाच गहनता , अनाकलनीयता , " मनाने अनुभवायच " अस काही नाहीये !

सरळ स्पष्ट " परफोर्म ओर पेरिश " " सर्व्हायव्हल ओफ फिट्टेस्ट "  . स्वर्ग बिर्ग असल काही नाहीये त्यामुळे " हतो वा प्राप्यसी स्वर्गं "असल काही नाही , "जगलास तर ऐश करशील" येवढ खर !

आता सांगा हे सोप्प आहे का " सगळ निराकार ... अनंत... ब्लाहब्लाहब्लाह  "  हे सोप्प ??
शिवाय मी जे सांगतोय त्याला खणखणीत पुरावा देता येतो ," निराकार ... अनंत " या विषयी काही विचाराल तर  " मौनं सर्वार्थ साधनं "

सगळा गोंधळ या " अध्यात्मा"ने केलाय , ही एक संकल्पना मनातून काढून टाका ,सगळी भीती मरून जाइल , बघा तुम्हाला पंख फुटल्याचा ,  फील येईल , मेंदू  पुर्ण क्षमतेने काम करायला लागेल , मोठी स्वप्न दिसायला लागतिल ,ती पुर्ण करण्याची इच्छा शक्ती बाहुंमध्ये येइल !!
( अध्यात्माचा स्विकार केल्यावर येते तशी स्मशान शांतता , अथवा कर्मदरिद्रीपणा येणार नाही ) .

असो .  स्पष्ट आणि डोळस विज्ञान निष्ठा असणाऱ्या कोणत्याही प्राण्याला हे मत  पटेल.  बाकी बरच आहे बोलण्या सारख बरच आहे , पण त्या साठी आधी बेसीक्स कळाल पाहीजे  ! 
लक्षात ठेवा अध्यात्म निराकार मुक्ती  ब्लाहब्लाहब्लाह चे किती ही पत्त्याचे बंगले बांधले तरी   " भस्मी भुतेच देहेच पुनरागमनं कुताः ?! " हे सत्य नाकारता येत नाही .

( क्रमशः)