बिंब माझ्या अनुभवांचे ज्यात नाही
ते फुलांचे गीत खोटे जात नाही
आज गाभाऱ्यात कां काळोखात दाटे
वाचली कां एकही फुलवात नाही ?
जन्म अख्खा कोरला त्याने कपाळी
भोगल्या वाचून कोणी जात नाही
जीवना ठाकेन मी पुन्हा लढाया
हा विसावा तू दिलेली मात नाही
कातडी कां जगा माझी राठ झाली ?
की तुझ्या घावात आता बात नाही ?