विम्बल्डन - एक सोहळा...!

आज जूनचा चवथा सोमवार..  विम्ब्ल्डनचा पहिला दिवस..
विम्ब्ल्डन म्हणजे तमाम टेनिसप्रेमींच्या मर्मबंधातील ठेव! यावर्षीच्या विश्वचषक फुटबाउल स्पर्धेच्या रणधुमाळीतही जातीचे
 विम्ब्ल्डनप्रेमी आजच्या दिवसाची वाट पाहात असतीलच..
आजकाल देशोदेशी असंख्य टेनिसच्या स्पर्धा असतानाही विम्ब्ल्डन आपले सार्वभौमत्व टिकवून आहे याची कितीतरी कारणे देता येतील. सेंटर कोर्ट्वरील ती गालिचा अंथरल्यासारखी हिरवळ, तो क्रीमच्या कार्टन्समध्ये लालचुटुक स्ट्राबरीज बुडवून खाणारा गोरागोरापान प्रेक्शकवर्ग,  पांढरेशुभ्र कपडे घालून आपला सर्वोत्तम खेळ पेश करणारे अनेक प्रसिद्ध व नवोदीत खेळाडू, स्पर्धेमागील प्रदीर्घ इतिहास , सारेच कसे 'जन्माला आल्यावर एकदा तरी अनुभवावे' या पठडीतले!
प्रत्त्येक टेनिस खेळणार्या खेळाडूचे, एकदा तरी सेंटर कोर्टवर खेळायला मिळावे, हे स्वप्न असते. स्टेफी ग्राफ, पीट संप्रास, मार्टीना नवरातिलोवा,फेडरर, विल्यम्स भगिनी अशा खेळाडूंचे तर इतके कौतुक होते की काही वेळा देवानाही त्याचा हेवा वाटावा... गेमचे स्वरुप, स्पर्धेचे नियम, अशा काही गोष्टी कालापरत्वे थोड्याफार बदलल्या असतीलही, पण तरिही या स्पर्धेतले काही सामने केवळ अविस्मरणीय असेच..! आठवून पाहा तो दोन वर्षांपूर्वीचा फेडरर विरुद्ध नदाल सामना! अजूनही अंगावर काटा येतो की नाही?
तर चला मग.. विम्ब्ल्डनच्या जल्लोशात चिंब भिजायला...  ही टेनिसप्रेमींची पंढरीची वारी अनुभवायला..!!