नक्राश्रू

ऐन उमेदीत तीच्या
स्वप्नांना लागली ठीगळे
नातेवाईक फिस्कारलेले
माहेरचे दोर केंव्हाच तूटलेले
आणि
सासर पार कोलमडलेले

चमचाभर कमाईत
कढईभर लेंढार
पीठा कण्यांची पक्वान्ने
ऐतोबांच्या पोटात सदैव खिंडार
वर टोमण्यांचा भडीमार

कोंड्या-खरड्यावर माजलेला तबेला
नकळतच मोठा झाला
ती गेली तेंव्हा
पालवी तीची खुडणारा
स्वार्थी कबिला
नक्रश्रू ढाळत
तीच्या तसबिरीसमोर पालथा पडलेला..