लाभले

 

गोड शब्दांचीच रोपे लावणारे लाभले
कौतुकाने काळजाला टोचणारे लाभले

शालजोडीतून करिती वार ते माझ्यावरी
वाचलेली लक्तरेही ओढणारे लाभले

नेसलेले सोडताना नाचले बेभान ते
षंढ होउन तो तमाशा पाहणारे लाभले

झोपडीला जाळताना हात नाही कापले
गंध राखेचे कपाळी फासणारे लाभले

ऐनवेळी वास्तवाला टाळणारे भेटले
घोळ सारे 
भावनेशी गुंफणारे लाभले.