उन्हाळी दुपार सुस्तावले रान
मुके पानपान जाहलेले
आंब्याच्या पानात पाखरे गुडुप
मेंढ्यांचा कळप आंब्याखाली
बाभूळ झाडाची फाटकी सावली
तेथे विसावली गुरे काही
सुक्या नदिकाठी नग्न उभे साग
आकाशात आग लागलेली
कुणी एक बाई सरपण शोधात
लेकरू पोटात वाढताना...
- वैभव देशमुख