नव्या पिढीला पुरातन वादांत रस आहे का ?

    शिवरायांचे गुरु, सीमा प्रश्न हे महाराष्ट्रातील पुरातन वाद आहेत. या वादांत चाळिशी-पन्नाशी ओलांडलेली पिढी मुख्यत्वे कार्यरत असलेली दिसते.  

    सध्याचा सोळा ते चाळीस हा शहरी वयोगट अत्याधुनिक जीवनशैलीतील आहे. तो बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करतो. या वयोगटात विविध जातीतील लोक एकदिलाने भारतासाठी म्हणून काम करताना आढळतात.   
    
    या नव्या पिढीला या वादांमध्ये रस आहे का ?
    रस नसेल तर अजून वीस वर्षांनी या वादांना अर्थ राहील का ?