भजी, वडापाव आणि दाबेली

कुठली भजी सर्वात चविष्ट? कांदा, बटाटा, घोसावळे की अन्य काही? पकोडा हा स्वतंत्र प्रकार मानावा की भज्यांचा उपप्रकार?

वडापाव या सामान्य आणि लोकप्रिय खाद्यप्रकारात काही आगळेवेगळे वैचित्र्यपूर्ण प्रकार बनवता येतील काय? बर्गर ला पाश्चात्य वडापाव म्हणावे काय?

दाबेली साधी चांगली लागते, की चीझ वगैरे घालून?

या आयुष्यातल्या जिव्हाळ्याच्या आणि नित्योपयोगी विषयावर चर्चा घडावी असे वाटते. वरील विषयावर प्रत्येकाचे व्यक्तीगत मते असतात आणि ती त्याचे खाद्यजीवन किती समृद्ध असावे याची झलकही देतात. आपल्या सर्वाना ही चर्चा उपयोगी होईल असे वाटते तरी या चर्चेत भाग घ्यावा.