सांगू दे - सांगू दे

सांगू दे - सांगू दे
प्रथमच तुज हे - मनीचे गुपीत
घेऊन आलीस मम जीवनी तू ... प्रीऽत प्रीऽऽत प्रीत।ध्रु।

असती - प्रेमळ गोष्टी - आऽणखीही - बोलायाच्या
गोष्टी परी त्या .. साऱ्या कशा सांग .. बोलू समोरी सर्वांच्या
आऽज परी .. इतके मात्र आहे .. करणे हे निश्चीत ।१।
घेऊन आलीस मम जीवनी तू ... प्रीऽत प्रीऽऽत प्रीत

मन हे -जेव्हापासुन - मानू लागे - तुजला अपले
निद्रेऽत जागेऽपणी  स्वप्न आहे .. माझ्या नयनांनी हे जपले
हाऽर तुझ्या .. बाहूंचे माझ्या .. कंठी तू गुंफीत ।२।
घेऊन आलीस मम जीवनी तू ... प्रीऽत प्रीऽऽत प्रीत

टीपा :

१. येथे
घेऊन आलीस मम जीवनी तू प्रीत प्रीत प्रीत
असे
म्हटले तर अर्थ नेमका होतो. (पण म्हणताना धाप लागते  ) जमत असल्यास म्हणावे

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच! साधारणपणे गागा... गागा... गागा... गागा...।गागा... गागा... गागा...  अशी काही लय आहे. पण मध्ये मोकळी जागा असल्याने कधी गागाल गागाल  असे तर कधी लगागा लगागा कधी गालगा गालगा असे स्वातंत्र्य घेतले आहे. कडव्याच्या पहिल्या ओळीत मध्ये काही न भरल्यामुळे म्हणताना खटकेबाज वाटते. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत मध्ये जास्त अक्षरे असल्यामुळे ओळ वाहती वाटते. ... हे सर्व भाषांतरात जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे हां.   मूळ गाण्यच्या चालीत भाषांतर जसेच्या तसे म्हणता येते. (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्यावर आधारित भाषांतर आहे ते ओळखा.  कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करू नका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... ईत  असे जमवा.