घुंगरांसारखा ... वाजतच राहिलो मी असे

घुंगरांसारखा... वाजतच राहिलो मी असे
कधी या पाउली
कधी त्या पाउली
बंधतच राहिलो मी असे...
घुंगरांसारखा... वाजतच राहिलो मी असे ।ध्रु।

तुटलो मी कधी - मज कधी तोडले
शेकडोदा तरी - मज पुन्हा जोडले
उगा नाडूनही
आणि ताडूनही
घडतच राहिलो मी असे ।१।
घुंगरांसारखा... वाजतच राहिलो मी असे

मी करत राहिलो - जे दुजे बोलले
शब्द माझे परी - मज मनी राहिले
कधी देवालयी
कधी नृत्यालयी
शोभतच राहिलो मी असे ।२।
घुंगरांसारखा... वाजतच राहिलो मी असे

असो अपुल्यांमधे - वा परक्यांमधे
--- राहती - फक्त पायांमधे
मग कशाचे रडे?
पदरी जे पडे
साहतच राहिलो मी असे ।३।
घुंगरांसारखा... वाजतच राहिलो मी असे

टीपा :

१. अर्थ : मी घडतच राहिलेलो आहे.
२. अर्थ : मी शोभतच राहिलेलो आहे.
३. अर्थ : मी सहन करतच राहिलेलो आहे.
४. मी वाजतच राहिलेलो आहे.
५. मारणे - मरणे तसे बांधणे - बंधणे! बांधलाच जात राहिलेलो आहे. त्याऐवजी गुंततच राहिलो मी असे असेही म्हणता येईल.
६. मी बांधलाच जात राहिलेलो आहे.


हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (गालगा - गालगा - गालगा - गालगा (स्रग्विणी? ) असे सर्वसाधारण वृत्त दिसते पण अनेक ठिकाणी गालगा गालगा ऐवजी ललगा गालगा किंवा लगा गागागा किंवा गाऽ गागालगा असे बदल आहेत. अर्थात चालीत म्हणायला काही त्रास होत नाही. ) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक .. अतच राहिलो मी असे  शी जमवा बरका!