जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे
राखतो या चेहर्याला निर्विकारी
लपविण्या हृदयातले काहूर आहे
सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहतो हा आसवांचा पूर आहे
काय लावू चाल मी या जीवनाला
जीवनाचे गीत तर बेसूर आहे
गवगवा ''कैलास'' करणे ठीक नाही
मूक आहे 'तो' तरी मशहूर आहे.
-डॉ.कैलास गायकवाड