ताकातला शेपू

  • ताक - ४ वाट्या.
  • शेपू - १ जुडी
  • लसूण - ४-५ पाकळ्या.
  • डाळीचे पीठ
  • मीठ
  • साखर - २ चमचे.
  • आले - १ ईंच
  • फोडणीचे साहीत्य.
१५ मिनिटे
३ ते ४ लोक

प्रथम कढईत तेलात जीरे , हिंग, हळद टाकून मस्त फोडणी करा. त्यात लसूण खमंग परता. मग शेपू परतून घ्या.

 तोपर्यंत  ताकाला वेगळ्या भांड्यात २-३ छोटे चमचे डाळीचे पीठ, मीठ, साखर आणि थोडेसे किसलेले आले लावून छान एकत्र करा. परतलेल्या शेपूत हे मिश्रण घालून एक छान उकळी आणा.

मला शेपूची डाळीतली भाजी उग्र वाटते. पण अशी आवडते. थोडक्यात शेपू घालून कढी केल्यासारखेच आहे.

आवडले तर जरूर सांगा. मी स्वयंपाक घरात नवी आहे.