कठोपनिषद मराठी साकीबद्ध रुपांतर वृत साकी नं१३ ते २४

किमर्थ न कळे कोपुनी म्हणती देतो तुजसि यमा /

निज अंगी तों स्वल्प दोषही आठवतो नच मातें//१३//

पित्राज्ञें यमसदना जरी निघोनियां म्यां जावे /

यमराजें तरी मत्साहाय्यें कार्य काय योजावे '//१४//

कठीण शब्दते बोलुनी तो तों झाला निमग्न शोकीं //१५//

मनस्ताप तो निज पितयाचा अनुमानियला तेणें/

कल्पित विरहव्यथा तयाच्या करी वदनावारी पेणें //१६//

म्हणे पित्याला 'भितां कशाला? किमर्थ पडलां शोकीं? /

तिकडे जाया सिद्ध असे मी; तद्वच सत्य असो की //१७//

सत्य वदावे; मिथ्या वचने जिव्हा न विटाळावी /

वचनोल्लंघनवेला येतां झटोनियां टाळावी //१८//

संत जहाले असती जे वा चरिते निट पाहा ती /

त्यांच्यापासुनी बोधदीप तो घ्यावा मनुजें हाती //१९//

स्तविली नाही असत्यवाणी कोणी संतजनांहीं /

अजरामरतालाभ कुणी वा तयें जोडिला नाहीं //२०//

देहाची या नसे शाश्वती तुम्हांस  कथितों भावे /

तनू रक्षाया असत्यवचनीं किमर्थ मग लोभावें //२१//

धान्य पिकावे गळुनी पडावें पुनरपी तेच रुजावे /

मर्त्यें त्यापरी व्यवहारावें मरोनी मग उपजावें //२२//

क्रम सृष्टीचा असा चालला अखंड जगता माजी/

आज नाउद्यां तनू जायाची कशास ममता माजी'? //२३//

यमालयातें गेला यापरी सांत्वुनी निज पितयातें /

जाय तेथ परी यमराजाची नोहे भेट तयातें //२४//

 पुढिल भाग पाठवला आहे १२ नंतरचा