जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा...

(चाल : गंगा जमुना डोळयात उभ्या का -)

होंडा इंडिका थाटात उभ्या का
जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा...  |धृ |

        कडकडुनी तू मिठी मारता, डोळे
        माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे
        आठवले सारे सारे गहाण ते गाळे
        तुज कर्जाचे भय न संगती, जा  |१|  जा मुला जा....

श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी  
बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी  
पूस रे डोळे या सदऱ्याने - आवर ती जाडी
रूप दर्पणी नसे देखणे, जा  |२|  जा मुला जा....

        आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची 
        जमले तिचे रे कैसे तुजवर लव्ह - लफडे
        हटू नकोस मागे मागे काम कितीही पडे  
        नकोस विसरू धुणि-भांड्याला, जा  |३|  जा मुला जा....