रिमझिम बरसत चिंब भिजवण्या श्रावण आला
कुजबुज कानी गूज उकलण्या श्रावण आला
हिरवे मन अन हिरवे तनही मोहरलेले
आनंदाचे बीज रुजवण्या श्रावण आला
काय मयुरा झाले मोदे नाचत असतो?
मोर पिसारे मस्त फुलवण्या श्रावण आला
सुर्यास्ताचे काळोखाचे भय ना आता
अंधराला लख्ख उजवण्या श्रावण आला
संथारा (*) व्रत चालू असता मन डळमळले
जगण्याचा उद्देश सांगण्या श्रावण आला
सरता श्रावण हुरहुर दाटे, खिन्न मनी मी
प्रश्न मनी का यर्थ परतण्या श्राअण आला
अंतर्मुख कोषात पुरे जगणे "निशिकांता"
बंद मनाचे दार उघडण्या श्रावण आला
(*) संथारा हे जैन धर्मियांचे एक व्रत आहे ज्यात मृत्त्यू येईपर्यंत उपवास करतात.
निशिकांत देशपांडे मों. नं. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com