बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा
दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा
जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही
जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा
देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली
मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा
मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी
लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा
श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला
राव असता मान होता आदबीचा या बसा