५८. अदिशा

ओशोंच्या ‘मेडीटेशन द फस्ट अँड लास्ट फ्रिडम’ या जगविख्यात पुस्तकातल्या  एका लेखाचं शीर्षक आहे : ‘जस्ट अ हंड्रेड अँड एटी डिग्री टर्न! ’

स्वत:पाशी येणं म्हणजे फक्त एकशेऐंशी अंशाच्या कोनात वळणं आहे!

जस्ट सी दि इंटेलिजन्स! साधं जाणीवेचा रोख बदलणं, जी सतत समोर रोखलीये तिच सरळ रेषेत माघारी आणणं इतकी सोपी गोष्ट आहे

इतक्या सोप्या गोष्टीपासून आपण का वंचित राहतो याचा उलगडा या लेखात करतोय

_______________________________________ 

माझ्या अस्पर्शित या लेखावर प्रतिसाद देताना मी एडिसनची गोष्ट सांगितली होती, कथेतला को‌अर पार्ट असा होता की खुद्द इलेक्ट्रिसिटीचा संशोधक विचारतोय ‘इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे तुमच्यापैकी कुणी मला सांगाल का?

याचे दोन अर्थ आहेत :

एक,  (त्या कथेच्या संदर्भात) उपयोगिता जाणली म्हणजे तत्त्व जाणलं असं नाही
दोन, (माझ्या लेखाच्या संदर्भात) शब्द जाणला म्हणजे सत्य जाणलं असं नाही

आता तुमच्या लक्षात येईल की आपण स्वत:प्रत न येण्याची दोन किती मजेशीर कारणं आहेत; एक, आपण भलताच अर्थ काढतो किंवा दोन, आपण शब्दच्छल करत बसतो आणि मग अर्थ हुकतो.

प्रतिसादकानं काढलेला अर्थ बघा:

>'थॉमस एडिसन' नावाच्या त्या गृहस्थानं 'इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय' ते सर्व उपस्थितांना समजावून सांगितलं असेल, नाही?

>नाहीतर मग त्या गृहस्थाला स्वतःच जे कळलेलं नाही, त्यानं इतरांना प्रश्न विचारून, ते निरुत्तर झाल्यावर मग 'तुम्हाला हे कळत नाही' म्हणून त्यांना हिणवण्यात काय अर्थ आहे?

>'For the greatest fool may ask more (questions) than the wisest person can answer'
या कॉल्टनच्या उक्तीचंच हे उत्तम उदाहरण ठरणार नाही काय? मग मुद्दा काय उरला?

आता खरा अर्थ असायं की खुद्द इलेक्ट्रिसिटीचा संशोधक म्हणतोय मी शोध लावलाय आणि उपयोगिता जाणतो पण तत्त्व जाणलेलं नाही. इथे 'इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय' ते सर्व उपस्थितांना तो समजावू शकत नाहीये हेच तर मी सांगतोय. तो इतरांना निरुत्तर करून हिणवत नाहीये, इट इज अ सिंपल फॅक्ट!

एडिसनचा शोध मानवतेवर उपकार आहे, त्याच्या शोधामुळे आपण ती उर्जा वापरू शकतो पण 'इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय' किंवा 'गुरूत्त्वाकर्षण म्हणजे काय',  पृथ्वीचं सूर्याभोवती एकाच कक्षेत फिरणं, तीचं स्वतःभोवती फिरणं, आपला अविरत चालू असलेला श्वास, साधी पापण्यांची अनैच्छिक उघडझाप  ही रहस्य आहेत आणि त्याही पुढे जाऊन निराकार ज्यात अशी अनेकानेक रहस्य सामावली आहेत तो तर सर्व रहस्यांचा स्रोत आहे, ते तर 'रहस्यांच रहस्य' आहे.

शास्त्रज्ञ स्वतःप्रत येऊ शकत नाही कारण त्याची नजर प्रक्रिया आणि तिच्या विश्लेषणावर आहे आणि शब्दवेल्हाळाचा अर्थ हुकतो कारण तो शब्दांचा गुलाम  आहे 

एकदा दिशा हुकली की पुढे आणखी मजा येते.

>बायदवे, आपण दिलेल्या कथेकरिता जालावर शोध घेतला असता फारसं काही निष्पन्न झालं नाही. एक ओशोंचा दुवा सापडला, त्यावरून त्यावर दिलेल्या या कथेच्या विश्वसनीयतेची अर्थातच फारशी खात्री देता येत नाही, पण सोयीकरिता तूर्तास तो ग्राह्य आहे असं धरून चालू.

आता मी स्वत:च्या शोधाविषयी लिहितोय आणि तुम्ही गुगल सर्च करताय. माझी कथा केव्हाच संपलीये, 'उपयोगिता जाणली म्हणजे तत्त्व जाणलं असं नाही' हा मुद्दा विषद झालायं.  मी तुम्हाला स्वत:प्रत येण्याचा मार्ग सांगतोय आणि तुम्ही जगप्रवासाला निघालात!

>सर्वप्रथम, एचोडीनं नव्हे, तर प्रिन्सिपलनं, "आम्ही तुम्हाला नंतर कळवतो" असं म्हटलेलं नसून, "आम्हाला 'इलेक्ट्रिसिटी' काम कशी करते, ते कळतं, पण खुद्द 'इलेक्ट्रिसिटी' म्हणजे काय, ते आम्ही सांगू शकत नाही" अशी प्रांजळ कबुली दिलेली आहे - फरक आहे!

आता प्रसंगातल्या व्यक्तीचा हुद्दा काये ते महत्त्वाचंय की कथेचं तात्पर्य? पण आपण अनेकानेक डिटेल्समध्ये निष्कारण शिरत जातो आणि ते आपल्याला स्वत:पासून आणखी आणखी दूर नेत जातं.

>(नि त्यावर) एडिसनसाहेबानं, "काळजी करू नका, तुमच्याप्रमाणेच मलाही 'इलेक्ट्रिसिटी' म्हणजे काय ते ठाऊक नाही, पण (पुन्हा तुमच्याप्रमाणेच) मीही 'इलेक्ट्रिसिटी' काम कशी करते, ते सांगू शकतो, " असं म्हटलेलं आहे.

कॅन यू सी? तेच तर मी सांगतोय! उपयोगिता जाणली म्हणजे तत्त्व जाणलं असं नाही असं खुद्द एडिसन म्हणतोय.

>ष्टोरीची (आणि ष्टोरीच्या मथितार्थाची) पूर्णपणे वाट लावलीत की हो! अगदी टोट्टल!

आता काय म्हणायचं? मी वाट लावली नाहीये, दाखवतोय!

मग आपण शब्दात कसे गुंतत जातो ते पाहा:

>आणि एडिसन इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटीच म्हणत होता की 'इलेक्ट्रिसिटी' म्हणा नाहीतर 'मॅग्नेटिझम' म्हणा किंवा आणखी काही म्हणा काय फरक पडतो, असे म्हणत नव्हता हे विशेष!

मी सांगतोय लेखनात काय लिहिलंय त्यावर चर्चा होऊ द्या, शीर्षकावर नको.  इलेक्ट्रिसिटीला मॅग्नेटिझम म्हटलं तरी फरक पडत नाही ती इलेक्ट्रिसिटीच राहते हेच तर मी सांगतोय कारण शब्द फक्त निर्देश करतो पण म्हणून काही संपूर्ण विरुद्ध अर्थी शब्दानं मी दिशाभूल करत नाहीये. सत्याच्या ‘दॅट वीच कॅनॉट बी टच्डला’ मी अस्पर्शितच म्हणतोय, बुळबुळीत म्हणत नाहीये.

>मीही दिलेल्या दुव्यावर जाऊन 'ती' गोष्ट वाचली आणि टग्या यांनी वर म्हटल्याप्रमाणे माझीही प्रतिक्रिया झाली.

आता तुम्ही स्वत:पासून इतक्या दूर गेल्यावर तुमची प्रतिक्रिया वेगळी कशी असेल?

मी तुम्हाला सांगतोय, ‘तुम्ही अर्थ आहात’ तुम्ही शब्दात अर्थ शोधताय. तुम्ही स्वतः अर्थ आहात हे कळल्याशिवाय तुमच्या शब्दांना अर्थ कसा येईल?  शब्द माध्यम आहे, अर्थ तुम्ही स्वतः आहात, तुम्ही जर शब्द धरून बसलात तर उलगडा कसा होईल?

मी सांगतोय शोधणाराच सत्य आहे आणि तुम्ही गुगलवर शोधताय, कसे भेटणार तुम्ही स्वतःला?  
______________________________________

साधी गोष्ट आहे, आपण स्वत: सत्य आहोत, आपल्याला शोधाचा रोख स्वत:प्रत आणायचाय, ‘जस्ट अ हंड्रेड अँड एटी डिग्री टर्न! ’

मग तुम्हाला कळेल आपण स्वत:ला ‘कुणी तरी’ समजत होतो म्हणून ‘कुठे तरी’ आहोत असं वाटत होत. ‘कुणी तरी’ आहोत वाटल्यानं वर्णन महत्त्वाचं होतं म्हणून शब्दाला धरून होतो आणि ‘कुठे तरी’ आहोत वाटल्यानं शोधाची दिशा महत्त्वाची होती.

ज्या क्षणी तुम्हाला कळेल की आपण स्वत:ला शोधत होतो त्या क्षणी सगळे शब्द व्यर्थ होतील कारण आपण मौन आहोत, शब्द उमटण्यापूर्वी आहोत आणि सर्व दिशा व्यर्थ होतील कारण शोधाची गरजच नाहीये, आपण आकाश आहोत, अदिशा आहोत, निराकार आहोत. आपण स्वत:ला जाणू शकतो, शोधू शकत नाही त्यामुळे दिशेचा प्रश्न व्यर्थ आहे.

कॉल्टंचं वाक्य ‘द ग्रेटेस्ट फूल मे आस्क मोर क्वेस्टशन्स दॅन द वाईजेस्ट कॅन आन्सर’ सत्याच्या संदर्भात चुकीचंय.

एनी फूल मे आस्क एनी क्वेस्टशन बट द वाईज मॅन वील ऑलवेज गीव ओन्ली वन आन्सर, यू आर द ट्रूथ!

कारण ज्ञानी जाणतो की प्रामाणिक विचारणा करणारा मूर्ख नाहीये, त्याला उलगडा होत नाहीये आणि स्वत:पासून दुरावल्यानं येणारी आंतरिक अस्वस्थताच प्रत्येक उपहासातून प्रकट होत असली तरी दुरावणं भास आहे.

मला इतका सुरेख लेख लिहायला मटेरिअल दिल्याबद्दल प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.

संजय

मेल : दुवा क्र. १