मराठी शब्द हवे आहेत - १४

मराठी शब्द हवे च्या १३व्या चर्चेत उत्स्फूर्तं प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.नव्या ताज्या चर्चाविषया सोबत मागील पानावरून पुढे.

मराठी विकिपीडियात व्यक्तिगत दूषणे आणि आरोप टाळण्याच्या दृष्टीने  असभ्य शब्द गाळणारी संपादन गाळणी सुविधा अद्ययावत करण्याचे काम चालू आहे. त्या करिता विविध  मराठी संकेतस्थळावरून संपादकांकडून वगळले जाणाऱ्या असांसदीय शब्दांची यादी व्यक्तिगत निरोपा द्वारे हवी आहे ( याचा अर्थ असे शब्द या चर्चेत लिहू नयेत) .

त्याच वेळी  काही अंशी रागावल्या नंतर व्यक्तिगत टिका आपल्या संस्कृतीचा भागही आहे. अशा रागावलेल्या व्यक्तींना पर्यायी  सुचवणी पुरवण्याच्या दृष्टीने,  त्यांचा राग मनमोकळेपणाने व्यक्त करू देणारे कठोर टीकात्मक पण सभ्यतेच्या (संसदीय) मर्यादेतील मराठी शब्द, शब्द समूह, वाक्यरचना हव्या आहेत.