================
भाग १
================
नायक
मी तृषित नि तू श्रावण
मी हृदय नि तू स्पंदन ।ध्रु।
हो नाऽऽ
नायिकेचा मुलगा
हो हो
नायक
डोळे घेतो मिटुनी तेव्हा स्वप्न तुझे मज दिसते
प्रेमाविण हे बेचव जीवन स्वप्न मला समजवते
हृदयाहृदयातिल रज्जूची तू अससी गुंफण ।१।
हो नाऽऽ
नायिकेचा मुलगा
हो हो
नायक
हृदय-लकेरी मी गाताना तू हळु त्या ऐकाव्या
गीते जणु कलिका प्रेमाच्या अलगद तू वेचाव्या
नाते - माझे नि तुझे जैसे - सुगंध अन् चंदन ।२।
हो नाऽऽ
नायिकेचा मुलगा
हो हो
====================
भाग २
====================
नायक
मी तृषित नि तू श्रावण
मी हृदय नि तू स्पंदन ।ध्रु।
हो नाऽऽ
नायिका
हो हो
नायिका
मी तृषित नि तू श्रावण
मी हृदय नि तू स्पंदन ।ध्रु।
हो नाऽऽ
नायक
हो हो
नायक
डोळे घेतो मिटुनी तेव्हा स्वप्न तुझे मज दिसते
नायिका
प्रेमाविण हे बेचव जीवन स्वप्न मला समजवते
नायक
हृदयाहृदयातिल रज्जूची तू अससी गुंफण ।३।
हो नाऽऽ
नायिका
हो हो
नायिका
नकळत जेव्हा जेव्हा पाही हातावरच्या रेषा
नायक
सांगू? त्या रेषांत पहाते मजलाच तुझी ईक्षा
नायिका
मी केवळ जणू प्रतिबिंब असे, तू तर मम दर्पण ।४।
हो नाऽऽ
नायक
हो हो
====================
भाग ३
====================
नायिका
मी तृषित नि तू श्रावण
मी हृदय नि तू स्पंदन ।ध्रु।
हो नाऽऽ
नायिकेचा मुलगा
हो हो
टीपा :
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... न किंवा ण असे जमवा बरका! यमकाची जागा ठळक केलेली आहे.