बारा-बारा-बारा

नमस्काऽर मंडळी,
कालची/आजची तारीख बघितलीत का? १२ डिसेंबर २०१२. संक्षिप्त लिहिली तर १२-१२-१२ होते.या कट्ट्यावर बारा या संख्येची महती सांगणारे प्रतिसाद लिहूयात.
"मनोगत"वर याआधीही आपण असे उपक्रम (की उपद्व्याप? ) केले आहेत-
चला मग करूया सुरुवात? या कट्ट्यावर बारा या संख्येची महती सांगणारी माहिती, वाक्प्रचार, म्हणी, कविता, श्लोक, सुविचार, घटना, किंवा अजून असे बरेच काही लिहूयात. गणिती, भाषिक, सांस्कृतिक, पारंपरिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक टीपांचेही स्वागत आहे.
या तारखा-त्रयी उपक्रमातले हे शेवटचे पुष्प. यानंतर अश्या तारखा बाविसाव्या शतकाच्या सुरुवातीला येतील. म्हणजे किमान ८८ वर्षांनी. 
-भोमेकाका