कर्ज

व्यथांचे जुने कर्ज फिटलेच नाही
सुखाचे धनादेश वटलेच नाही

असा एक मी आरसा कमनशीबी
समोरी कुणी हाय! नटलेच नाही

कुणा हरविण्याचा इरादाच नव्हता
तसे हे कुणा सत्य पटलेच नाही

युगे मी उभा उंबर्‍यापार आहे
कुणी 'आत ये बाळ' म्हटलेच नाही

न जवळीक होती जराही तिच्याशी
दिसाया जरी हात सुटलेच नाही

---------------------------------------- जयन्ता५२