फोडणीची पोळी

  • शिळी पोळी २
  • पाव ते अर्धा कांदा बारीक चिरून
  • हिरव्या मिरच्यांचे तुकडे ४-५
  • लाल तिखट पाव चमचा,
  • मोहरी, हिंग, हळद
  • भाजलेले दाणे मूठभर
  • मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर, खवलेला ओळा नारळ
  • लिंबू
  • फोडणीकरता तेल
१५ मिनिटे
फोडणीची पोळी

पहिल्याप्रथम शिळी पोळी खूप बारीक करून घ्या. हाताने बारीक करता आली नाही तर मिक्सरमधून बारीक करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करा. नंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे , भाजलेले दाणे, चिरलेला कांदा घालून परता. त्यावर झाकण ठेवून एक वाफ द्या. २-४ मिनिटांनी झाकण काढा व परत परता म्हणजे कांदा व मिरच्या नीट शिजेल. नंतर त्यात बारीक केलेला पोळीचा कुस्करा घाला. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व थोडी साखर घाला, चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण एकसारखे ढवळून घ्या म्हणजे सर्व पोळीला तिखट मीठ सारखे लागेल. खायला देताना त्यावर परत थोडी चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून द्या. सोबत लिंबू हवे.

टीपा नाहीत.