सगळी कामं आटोपल्यावर करते वाचन लेखन
आता मात्र आधी काय करावे
गोंध्ळ होतो डोक्यात मनात
टाइमम्यानेजमेंटचं दडपण वाढलंय
डाळींब सोलावं की वाचन करावं
याचाच ताण वाटतोय
डाळींब खाल्लं तर पित्त पोटाचे विकार
अमुक तमुक कमी होईल
आधी ते सोलायला हवं तर खाता येईल
कसदार वाचलं तर मनाची अस्व्स्थता कमी होईल
काहीतरी लिहिल्यावर हलकं वाटेल
हे करण्यासाठी एकाग्रता हवी
एकाग्रतेसाठी आरोग्य चांगलं हवं
चांगल्या आरोग्यासाठी डाळींब खाणं चांगलं
ते खाण्यासाठी आधी ते सोलायला हवं
मग वाचनाच काय करायचं?
सावित्री जगदाळे