पारणं
खुशाल जगावं असं जीवनात काही राहिलंच नाही
जीव गुंतावा कुणात असं माझं कुणी उरलंच नाही
थांबून आहेत फुटाया पाझर उरातही दडलेले
उचंबळूनी वाहावे ते असं कुणी भेटलंच नाही
सदाचेच झाले चटक्यांनीच येणे-जाणे दिसाचे
डोळे सुखावनारं तांबडं अजूनी फुटलंच नाही
गेल्या बुजूनी जरी जखमा अजूनी ओलसर खपल्या
सयींच्या शुळांमूळे भळभळनं त्यांचं थांबलंच नाही
घेत होतीस निरोपा तू भिडवूनी नजरेला नजर
होतं टिपायच ते पाणी तुझ्या डोळा आलंच नाही
पाहू दे नजरभरून तुला पुन्हा पुन्हा थांब जराशी
आधाशी या डोळ्यांच पारणं अजून फिटलंच नाही
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.