आभास
भासते कधी मला
तु समिप यावे
बिलगुनिया तुजला मी
नयनी तव भिनावे
मन्मनी जे वाटतसे
सांगू तुला गुज कसे
जीव पदी तव वाहीन
आस एक मनी वसे
मम मनीच्या भाव फुला
उमगेल का कधी तुजला
अलगद टिपता अधरा
लपेटून घे मजला
ध्यास, श्वास, मनी आस
करिती सारे निराश
वसा सखीचा जपते मी
असो भास वा आभास
अस्तित्वाचा प्रश्न पडता
आशेचे ते किरण दिसता
कोडे पडते असे परंतू
उत्तर नकळे माहित असता.