काळे पाणी --- ३

           काळे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तुरुंगाचॅ बांधकाम इ.स.१८९६ मध्ये सुरू झाले व १९०६ मध्ये ते पूर्ण झाले. ब्रम्हदेशातून आणलेल्या गडद लाल रंगांच्या विटांनी ते केले होते. वर्तुळाच्या सात त्रिज्यारेषावर बांधकाम केलेल्या तीन मजली सात इमारतींचे मूळ बांधकाम होते.मध्यभागी बांधलेल्या मनोऱ्यावरून त्यांचे नियंत्रण करण्यात येत असे व एका भागातून दुसऱ्या भागात या मनोऱ्यामधूनच जाता येते.प्रत्येक भागासमोर दुसऱ्या त्रिज्येवरील भागाची पाठ येत असल्यामुळे एका कोठडीतील कैद्याला दुसऱ्या कोठडीतील कैद्याचे तोंडही दिसत नसे त्यामुळे सावरकर बंधू दोघेही या एकाच तुरुंगात असताना त्याना दोन वर्षेपर्यंत आपण एकत्र रहात आहोत हे माहीत नव्हते. मनोऱ्यात टांगलेल्या मोठ्या घंटेच्या सहाय्याने काही आणीबाणी निर्माण झाल्याचे सूचित होत असे. प्रत्येक इमारतीत ९९ अश्या एकूण ६९३ कोठड्या होत्या.त्यांचे मोजमाप ४.५ मी.लांव २.७ मी रुंद असून तीन मी.उंचीवर एक झरोका होता. मधमाश्यांच्या पोळ्या वा पेशींसारखी रचना असल्यामुळे त्याला सेल्युलर तुरुंग म्हटले गेले.सध्या अस्तित्त्वात त्यातील तीनच कक्ष असून स्वा.वी.सावरकरांना ठेवण्यात आलेली कोठडीच फक्त दाखवण्यात येते.त्यांच्यासाठी एका कोपऱ्यात दोन्हीकडे भक्कम जाळीची दारे बसवलेली कोठडी होती.त्यातून फाशी देण्याची जागा दृष्टिपथात येत असे व प्रत्येक फाशी जाणाऱ्या कैद्याला मुद्दाम सावरकरांच्यासमोर फाशी देण्यात येऊन त्यांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न
ब्रिटिश सरकारला राजकीय बंदी व क्रांतिकारक यांना अगदी वेगळे ठवायचे होते म्हणून त्यांनी अंदमान बेटाची योजना केली होती  
       अंदमान सेल्युलर जेल एक कक्ष
      प्रवेशद्वार

  बहुतांश बंदीवान स्वतंत्रपणे चळवळ करणारे होते.त्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याव्यतिरिक्त काही प्रसिद्ध बंदीवानांपैकी डॉ.दिवानसिंघ,मौलाना फज़ल ए हक खैराबादी,योगेंद्र शुक्ला,बटुकेश्वर दत्त,मौलाना अहमदुल्ला,मौलवी अब्दुल रहीम, सादिकपुरी, बाबाराव सावरकर,भाई परमानंद,शादन चंद्र चटर्जी,सोहन सिंघ,वामनराव जोशी आणि नंदगोपाल हे होत,अलिपूर खटल्यातील बारिंद्र कुमार घोष,उपेंद्रनाथ बॅनर्जी,बिरेंद्र चंद्र सेन,जतिश चंद्र पाल हे पण त्यामध्ये होते त्यांच्यापैकीच एक बाघा जतिन बेहरामपूर येथील तुरुंगात स्थलांतरित झाले व तेथे त्यांचा १९२४ मध्ये गूढ मृत्यु झाला मार्च १८६८ मध्ये २३८ बंदिवानांनी निसटून जाण्याचा प्रयत्न केला पण एप्रिलमध्येच सर्वांना पकडण्यात आले.त्यापैकी एकाने आत्मघात करून घेतला तर उरलेल्यांपैकी ८७ जणांना अधीक्षक वॉकरने फाशी सुनावली. तुरुंगातील अमानुष वागणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी १९३० मध्ये झालेल्या अन्नसत्याग्रहात भगतसिंग यांचा जोडीदार महावीर सिंग याला जबरदस्तीने दूध पाजण्यात आले व ते फुफ्फुसात शिरून तो मरण पावला.त्याचे शरीर दगडास बांधून समुद्रात सोडण्यात आले.महात्मा गांधी व रविंद्रनाथ टागोर यांनी यात मध्यस्थी केल्यावर राजकीय बंद्यांना या तुरुंगातून हलवण्यात आले.
जपानचे आक्रमण
         दुसऱ्या महायुद्धात १९४२ मध्ये अंदमानवर जपानच्या राजाने कब्जा केला व ब्रिटिशांना पळवून लावले व त्यावेळी त्या तुरुंगात ब्रिटिश कैद्यांना ठेवण्यात आले. त्यावेळी सुभाषचंद्र बोस यांनीही बेटास भेट दिली.पण महायुद्ध समाप्तीच्या वेळी पुन्हा ब्रिटिशांनी त्यावर कब्जा केला. जपानी सैन्याने दोन कक्ष पाडले तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अंदमान बेट भारत सरकारच्या ताब्यात आल्यावर भारत सरकारने त्यांचाच कित्ता गिरवून उरलेले कक्षा पाडण्याचे महत्वपूर्ण काम हाती घेतले कारण नवे काही बांधणे शक्य नव्हते.पण काही पूर्वीचे बंदीवान व पूर्वसुकृताचे भान असलेले काही राजकीय पुढारी यांनी आपल्या स्वातंत्र्यवीरांचा कसा छळ झाला याची निदान आठवण तरी पुढच्या पिढीला रहावी म्हणून ते पाडण्यास विरोध केल्यामुळे उरलेले तीन कक्ष पाडले नाहीत व १९६९ मध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याचे रूपांतर केले. १९६९ मध्ये ४० डॉक्टर्स व ५०० खाटांचे गोविंद वल्लभ पंत रुग्णालय सेल्युलर जेलच्या आवारात उभारण्यात आले. अंदमानमधील जनतेसाठी ते उपयुक्त आहे