पास्ता

  • पास्ता ३ मुठी भरुन नळकांडीच्या आकाराचा किंवा जो आवडेल त्या आकाराचा
  • चिरलेला कोबी वाटीभर, गाजर१, सिमला मिरची अर्धी, मटारचे दाणे वाटीभर
  • लसूण २-३ पाकळ्या
  • चिरलेला कांदा ४ चमचे
  • टोमॅटो सॉस ४२५ ग्रॅम, (hunt's किंवा spaghetii) जे आवडेल ते
  • तेल, तिखट १ चमचा, धने-जीरे पूड १ चमचा, मीठ
३० मिनिटे
२ जणांना

सर्वात प्रथम एका कढईत पास्ता पाणी घालून शिजवून घ्यावा. नंतर तेलाच्या फोडणीमधे बारीक चिरलेल्या लसुण पाकळ्या व कांदा घालून परतणे. नंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची उर्फ ढब्बू मिरची, व मटारचे दाणे घालून परतणे व मंद वाफेवर शिजवणे (जशी भाजी शिजवतो तसे). नंतर त्यात १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने-जिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घालून परतणे. परतून झाल्यावर त्यात शिजवलेला पास्ता व टोमॅटो सॉस घालून ढवळणे. १-२ वाफा देवून परत ढवळणे.

गरमागरम पास्ता  खाणे, त्यानंतर आवडीचे आइसस्क्रीम खाणे.

रोहिणी

नाहीत.

श्री राजेश गोस्वामी