मराठीतील षष्ठी विभक्ती प्रत्यय

मराठीत षष्ठी विभक्ती प्रत्यय लावताना मूळ शब्दात काय बदल होतो? त्याविषयी काय नियम आहेत? उदा. घोडा या शब्दाचे रूप घोड्या- असे होते. (घोड्याचे, घोड्याचा, घोड्याची, घोड्याच्या) पण माया शब्दाचे रूप बदलताना माय्याचे असे न होता मायाचे, मायाची असे होते. अकारान्त शब्दाला "आ" जोडावा लागतो. वाघ शब्दाची  वाघाचे, वाघाचा, वाघाची, वाघाच्या अशी रूपे बनू शकतात. हे असे शब्द सोडले तर इतर शब्दात काहीच बदल होत नाही. उदा. वास्तू - वास्तूचे, वास्तूचा, वास्तूच्या, वास्तूची / बाई - बाईचे, बाईचा, बाईच्या, बाईची

हे निरीक्षण बरोबर असेल तर मराठीत affix आणि prefix नियम बनविणे बहुतेक शक्य होईल असे वाटते. त्याचा एक नमुना येथे पाहता येईल.

दुवा क्र. १

कोणाला जर हे नियम वापरून कसे शब्द बनतात हे पहायचे असेल तर त्यासाठी एक अतिशय चांगले सॉफ्टवेअर उपलब्ध आहे.

दुवा क्र. २

"घोडा" या शब्दापासून  बनणारे षष्ठी विभक्तीचे चारही शब्द या चित्रात दाखविल्याप्रमाणे तपासता येतात. म्हणजे आपण फक्त "घोडा/च" इतकीच नोंद मूळ डिक्शनरीत करायची आहे. प्रत्यक्षात स्पेल चेक हे चार शब्दही या डिक्शनरीत आहेत असे समजून शब्द तपासेल.
घोडा या शब्दाची रूपे अशी बनतात.

घोडा शब्द रूपे

घोडा शब्दाबरोबर "च" हा कोड वर्ड जोडला आहे. त्यामुळे SFX नंतर "च" आलेले सर्व नियम सॉफ्टवेअर वाचेल. असे नियम आहेत एकूण २६८

SFX च Y 268

यातील फक्त नियम क्रमांक १७७ ते १८० घोडा शब्दाला लागू होतात. कारण "घोडा" शब्दाच्या शेवटी "डा" आहे. व या चार नियमांच्या शेवटच्या चौथ्या स्तंभात (column) देखील "डा" आहे.

SFX च डा ड्याचा डा
SFX च डा ड्याची डा
SFX च डा ड्याचे डा
SFX च डा ड्याच्या डा

आता हा शब्द प्रत्यक्षात वापरताना शेवटचा "डा" काढून टाकून त्याला "चा" विभक्ती प्रत्यय जोडताना त्यात "ड्याचा" असा बदल होतो. तिसऱ्या स्तंभात असलेले "डा" हे अक्षर काढून त्याच्या जागी चौथ्या स्तंभात (column) असलेले अक्षर जोडायचे आहे.

घोडा - "डा" = घो

घो + "ड्याचा" = घोड्याचा

अशा पद्धतीने चार शब्द बनतील घोड्याचा, घोड्याची, घोड्याचे, घोड्याच्या

सर्व शब्दांना जर अशा नियमात बसवता आले तर मूळ डिक्शनरीचा आकार लहान ठेवता येईल. त्यात शब्द कमी / जास्त करणे सहज शक्य होईल. मराठी डिक्शनरीला जागतिक स्टॅण्डर्ड मिळेल असे वाटते.

षष्ठी विभक्ती प्रत्ययापुरता मर्यादित असलेला कोड मी दुवा क्रमांक १ मध्ये वर दिला आहे. कोणी हा कोड तपासून तो बरोबर आहे असा निर्वाळा दिला तर त्यात आणखीन भर घालता येईल.