संगणकावर मराठीतील समानार्थी / विरुद्धार्थी शब्द

लिबर ऑफिसच्या रायटरमध्ये मराठी स्पेलचेक एक्स्टेंशन जोडले की आपल्याला शब्दांचे अर्थ / समानार्थी किंवा विरुद्ध अर्थी शब्द उपलब्ध करून देता येतील. खाली दिलेल्या स्क्रीनमध्ये "अधिकार" असा शब्द टाईप करून राइट क्लिक केली की  "synonym" असा पर्याय दिसत आहे. त्यात समानार्थी शब्द जसे "सत्ता, प्रभुत्व, पद, सामर्थ्य" दिसत आहेत. सर्वात शेवटी "thesaurus" असा पर्याय दिसत आहे. त्यात शब्दांचे अर्थ किंवा सामान्यरूपे दाखवत येतील.

समानार्थी शब्द राईट क्लिकवर

समानार्थी शब्द वाढविण्यासाठी या प्रकल्पाला स्वयंसेवकांची गरज आहे. वाचकांपैकी कोणाला वेळ / आवड असेल तर स्वागत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये शब्द कसे टाकायचे ते येथे देत आहे.

१) डाऊनलोड सेक्शन

अ) 7 zip हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.

दुवा क्र. १

ब) प्रुफींग टूल हे सोफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या.

दुवा क्र. २

क) लिबर ओफिसचे मराठी एक्स्टेंशन डाऊनलोड करा.

दुवा क्र. ३


२) इन्स्टॉलेशन्स सेक्शन

अ) 7 zip हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे याची खात्री करून घ्या.
ब) प्रुफिंग ट्ल्सच्या झिप फाईलवर राईट क्लिक करून 7 zip च्या पर्यायांतर्गत unzip to folder xxxx/ हा पर्याय निवडा.
क) तसेच लिबर ऒफिसच्या oxt फाईलवर राईट क्लिक करून 7 zip च्या पर्यायांतर्गत unzip to folder xxxx/ हा पर्याय निवडा.

३) सॉफ्टवेअर वापर:
प्रुफिंग टुल्सच्या अनझिप केलेल्या फोल्डरमध्ये ३२ बिटची फाईल डबलक्लिकने उघडल्यावर हे सॉफ्टवेअर सुरू होईल. त्यात "thesaurus" टैब मधील "open" बटणावर क्लिक करून थिसोरस फाईलचा   पाथ द्या (th_mr_IN_v2.dat) . ही फाईल आपण वर दिलेल्या २) क) या पर्यायात डाऊनलोड करून अनझिप केलेली आहे.

थिसोरस टैब

आता थिसॉरसमध्ये मी आधीच टाकलेले शब्द जसे "अधिकार" , "घोडा" वगैरे आपल्याला दिसू लागतील.
आपण "add" या बटनावर क्लिक करून आपल्याला हवे ते शब्द यात जमा करू शकता. समानार्थी /विरुद्धार्थी शब्द एकाखाली एक असे टाईप करायचे आहेत. काही शब्द जमा झाले की "sort"  बटणावर क्लिक करून शब्द सेव्ह करून घ्या.

शब्द जमा करा

पुरेसे शब्द जमा झाले की थिसोरस फाईल (th_mr_IN_v2.dat) इतर सर्व फाईलसकट झिप करून माझ्याकडे  ईमेलने पाठवा. मी एकदा शब्द पाहून ते मुख्य सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध करून देईन.  हे काम मराठी भाषेवरील प्रेमाखातर (माझ्यासकट) सर्वांनी विनामूल्य करायचे आहे.

ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षाह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये. ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.