बिग बॉस आणि स्वैराचार

     बिग बॉस कार्यक्रमात राजेश शृंगारपुरेने रेशम टिपणीसबरोबर अतिरिक्त मोकळेपणा दाखवला.  महेश मांजरेकरांनी त्यासंदर्भात टिप्पणी केली की, हा कार्यक्रम कुटुंबे पाहतात. त्यांच्यासमोर असे काही येणे योग्य नाही. राजेशला कार्यक्रमाबाहेर जावे लागले. 
     कार्यक्रमासंदर्भात काही प्रश्न
१. राजेशच्या बाहेर जाण्याने कार्यक्रम सभ्य होईल का ? जवळीक हा विषय सोडला तर मारामारी, अद्वातद्वा बोलणे, संगनमत हे प्रकार या कार्यक्रमात आहेत. हे सगळे कुटुंबांना  दिसलेले  चालणार आहे का ?
२. चित्रपटसृष्टीत मुळातच  जवळीक, संगनमत हे प्रकार  पहिल्यापासून चालत आलेले आहेत. बिग बॉस या कार्यक्रमामुळे ते काही लाख लोकांना दिसले, एवढेच. मराठी समाजात  गेल्या काही वर्षांत मोकळेपणा आला आहे.  यापुढे असे कार्यक्रम टीव्हीवर प्रकाशित होणे अपरिहार्य आहे का ?