हिन्दु की सिन्धु

          नुकताच जालावर एक सन्देश अग्रेशित होऊन मला मिळाला त्यानुसार आपली आत्तापर्यंतची समजूत "हिन्दु" हा शब्द "सिन्धु" या शब्दाचा अपभ्रंश होऊन रूढ झाला आहे ही चुकीची आहे.तो सन्देश मी खाली देत आहे,मला तो अगदी चूक आहे असे वाटले नाही पण त्यातील व्युत्पत्तीबद्दल मला शंका आहे. जाणकार व विचारशील मनोगतींनी त्यावर आपले मत व्यक्त करावे.
      हिन्दू हा शब्द "सिन्धू" शब्दाचा अरबी अपभ्रंश आहे असे आपल्याला आतापर्यंत सांगितले गेले आहे,पण खालील लेखात ते कसे असत्य आणि दिशाभूल करणारे आहे ते सप्रमाण सिद्ध केले आहे.
"हिन्दू" हा शब्द "हीनं दुष्यति इति हिन्दू:। म्हणजे "जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हणतात. हा शब्द अनन्त वर्षाचा प्राचीन मूळ संस्कृत शब्द आहे. व याचा विग्रह "हीन + दू म्हणजे हीन भावनेपासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू "
मूळ लेख बराच मोठा आहे व त्यात अनेक संदर्भ दिले आहेत त्यातील फक्त काही देऊन प्रस्तावाची लांबी वाढू नये अशी दक्षता घेतो.
"बृहस्पति अग्यम (ऋग्वेद) मध्ये
"हिमालयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं ।
तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते 
कल्पद्रुमा त "हीनं दुष्यति इति हिन्दू:।
"माधव दिग्विजय "मध्ये  "ओंकारमन्त्रमूलाढ्य,पुनर्जन्म द्रढाश्य: ।गोभक्तो भारत:,गरुर्हिन्दुर्हिसन दूषक: ॥
म्हणजे "जो औमंकाराला ईश्वररचित रचना मानतो,ज्याची पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यावर श्रद्धा आहे,जो गौ पालन करतो,आणि वाइटाला दूर ठेवतो तो हिब्दू आहे.
याशिवाय आणखीही काही संस्कृत श्लोक आहेत पण ती पुनरुक्तीच होण्याची शक्यता आहे म्हणून येथेच थांबतो.
मनोगतींनी आपले विचार मांडावेत. मी स्वत: यात काहीही भर वा बदल केले नाहीत.