हलकेच चांदण्यांचा

हलकेच चांदण्यांचा शीतभास उग्र झाला


तो चंद्रमा नभिचा देऊन दाह गेला


व्रण घेऊनी ऊरीचे मार्गस्थ होत गेलो


ना कळले मलाच केव्हा सोडुन प्राण गेला


 


धग उष्म जाणीवेची दुःखात उब झाली


माझीच सावली मग माझीच साथ झाली


म्रुदु भावनाही तेव्हा निमिशात शुश्क झाल्या


 ना कळले मलाच केव्हा सोडुन प्राण गेला


 


चंद्राकडे बघुनी खिःन्न हासलो मी


हा दोष ना कुणाचा दैवास कोसीले मी


नशिबात आपुल्या का वाटा विरुद्धा होत्या


ना कळले मलाच केव्हा सोडुन प्राण गेला


 


आकुंचिले मनाने ह्रुदयास मात्र आता


नको बन्ध हे विषारी हा मुकुट टाचण्यांचा


तो हार भावनांचा का काल फ़ास झाला


ना कळले मलाच केव्हा सोडुन प्राण गेला


 


जाळून सर्व माया ह्रुदयास कोंडीले मी


तोडून सर्व नाती एकान्त भोगीला मी


माझ्याच शासनाने म्रुत्यु ही स्तब्ध झाला


ना कळले मलाच केव्हा सोडुन प्राण गेला