आम !

  • १ मध्यम आकाराची कैरी
  • ३/४ कांदे - पांढरे असल्यास उत्तम
  • २ हिरव्या मिरच्या
  • अर्धी वाटी कोथंबीर
  • थोडासा नारळ किसून
  • हळद, हिंग पावडर, मिरची पावडर, तेल (टेबलस्पून), साखर, मीठ, हळद
१५ मिनिटे
४ जणांसाठी

कांदे व हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावे.

कैरी व नारळ किसून घ्यावा - नारळ साधारण अर्धी वाटी (आमटीची)

हे पदार्थ नीट एकजीव करून घ्यावेत.

वरून कच्चे तेल (१ टे. स्पून), हिंग पावडर व हळद - चिमूटभर,

साखर, तिखट व मीठ (आवडीनुसार) टाकणे.

मुगाच्या डाळीच्या खिचडी बरोबर छान लागतो !

आई -