शेरलॉक होम्स चातुर्यकथा

नागपुर मधे आमचे शेरलॉक होम्स चातुर्यकथा अभ्यासमन्डळ नावाचे एक मन्डळ आहे, त्याबद्दल ही माहीती.


आम्ही ८/१० जणांचा गट प्रत्येक बुधवारी ५.३० ते ६.३० या दरम्यान भेटत असतो. आम्हासर्वांना होम्स च्या कथा लहानपणा पासुन आवडतात. आम्हापैकी काही जणानी होम्सच्या कथा जवळजवळ ३० पेक्षा जास्त वेळा वाचलेल्या आहेत. 


आम्ही येनारया आठवड्यात होणारयाचर्चेचा विषय म्हणजे कथेचा क्रम ठरवुन घेतो. मग प्रत्येक जण मला या कथेत काय काय आवडले हे सांगत जातो. अर्थात यासाठी खालील निकष लावले जातात.


१. इग्रंजी भाषेचे वैभव उदा. सुन्दर वाक्ये, वर्णने, व्यक्तीचित्रण,नवीन शब्द इत्यादी  इत्यादी.


२. होम्स म्हणजे निरीक्षण आणि उपलब्ध पुराव्यातुन योग्य तो नित्कर्ष काढणे. त्या-त्या कथेतील अशा प्रसगांचा आस्वाद घेणे.


३. सभाषण चातुर्य.


४. समयसुचकता असलेली प्रसंग, घटना यांचा आढावा घेणे.


५. होम्स आणि वॉटसन या जोडगळी चे एकमेकांवर असणारे प्रेम, स्नेह आणि माणुसकी वर असणारी श्रध्दा. काम आणि त्यातुन मिळणारे समाधान हेच मह्त्वाचे हे सागंणारे अनेक प्रसंग. यातुन प्रेरणा घेणे.


६. १००/१२५ वर्षापुर्वीचे समाजमन, राजकीय आणि सामाजिक स्थिती.


७. व्यावसायीक वृत्त्तीचा शोध, या काल्पनीक पात्रातुन आपल्यापेशाशी तादात्म कसे पावावे हे शिकत राहने.


८. सर कॉनन डॉयल यांचे इतर वैशिष्टे.


९. काही प्रासंगिक विषय.


 


आमचा १ तास या खेळीमेळीच्या वातावरणात कसा निघुन जातो हे समजत सुध्दा नाही.


तुम्ही नागपुर ला आलेत तर जरुर-जरुर आमच्या मंडळाला भेट द्या.