का असा मी वागतो?

का असा मी वागतो?


का असा मी वागतो?
मग पुन्हा वैतागतो


पापण्यांचा टोमणा
"सोयरा का लागतो!"


कोरडे ओढू नका!
भाकरी मी मागतो


मौन ऐसा दागिना
बोलण्याने डागतो


शून्य जेव्हा राहते
शून्य मी का भागतो?


हा कशाचा सूर्य जो
झोपतो, मग जागतो


पाजशी तू दूध का?
नाग आहे नाग तो!


पौर्णिमा स्मरताक्षणी
चंद्रवेडा भागतो


 चित्तरंजन


प्रेरणा
कविवर्य नीलहंस यांची सूर्य जेव्हा जागतो ही गझल

अवांतर
हझलेचा शेर होईल असे वाटले म्हणून

षड्ज जेव्हा लागला
मज कळाले काग तो


हा शेर गझलेपासून वेगळा केला.