संगणकावरील मराठीचे तंत्र - एक चौकशी

नमस्कार मित्रहो,


मनोगतवर लिहिण्याची माझी पहिलीच वेळ आहे. हे मराठी portal बघून फार फार आनंद झाला. त्याबद्दल ह्या संकेत स्थळाच्या निर्मात्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. फारच सुंदर, परिपूर्ण आणि उपयुक्त! (तेव्हढा कुणाला portal ला मराठी शब्द माहित/सुचत असल्यास कृपया सांगावा.)


रोजच्या संगणकीय वापरात मराठीच्या उपयोगाबद्दल खालील बाबतीत येथील तज्ञांकडून सल्ला घ्यावा म्हणतो.


१. मायक्रोसॉफ़्टची मराठी संगणकीय प्रणाली येत आहे असे वाचनात आल्याचे स्मरत आहे. ही बातमी बरोबर आहे का? तशा प्रणालीत मनोगत, ई-सकाळ, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी संकेतस्थळाचे काम असेच चालेल का? मुख्य करून येथील लिप्यंतर सारखी तंत्रे.


२. मराठी keyboard अस्तित्वात आहे का? (कुणी keyboard लाही मराठी शब्द सुचवू शकेल का?) असल्यास त्याचा संगणकावर मराठी लिहिण्यास काही फायदा होईल?


३. नुकतेच मी फाटकांच्या खिडकीला कंटाळून (म्हणजे Gates च्या Windows ला) ऍपल प्रणालीवर स्थित्यंतर केले. पण तेव्हा पासून मनोगत, ई-सकाळ, म. टा. इत्यादी संकेत स्थळे वाचणे अशक्य झाले आहे. ह्या पैकी कोणतीच स्थळे ऍपलवर वाचता येत नाही. ह्यावर तोडगा काय? का संगणकावर मराठी वाचायचे असल्यास फाटकांचे पाय धरणे आले? (जगातील सर्व 'मराठी फाटक' मंडळींचा खेळकर आणि समजूतदारपणा ग्राह्य धरून हा शब्द खेळ. चूभूद्याघ्या.)


ह्या बाबतीत मराठी प्रेमी आणि उत्साही मंडळीना काही महिती असल्यास कृपया कळवावे. आपला फार ऋणी राहीन. बाकी इतरही काही सूचना, सल्ला असल्यास जरूर कळवावे. आपण नुसते हे वाचले तरी मल हर्षच होईल.


लेखनसीमा.


आपला नम्र,


अभिजात