रवानी गझल

तू असा सोडुन गेला 
डाव हा मोडुन गेला


रंगला माझ्यात तेंव्हा 
संग का सोडुन गेला


गुंफले नात्यात नाते 
बंध का तोडुन गेला


कोरले श्वासातुनी जे 
नाव का खोडुन गेला


दूर जाताना अबोला
बोलका जोडुन गेला