पहाटबावरी...

हा असा गुन्हा, पुन्हा पुन्हा करून टाकतो
रात्र धुंद... मंद गंध मंतरून राहतो!


ये समीप घालवू नकोस वेळ चालली
मोगरा तुला फुला हळूच आज माळतो


चांदणीस मी बजावले नकोस येवु तू...
बोचते उपेक्षिण्यातलेच दुःख जाणतो!


चंद्रही कसा फितूर जाहला प्रिये तुला
वाट पाहण्यातली सजा हसून पाहतो


सैल ही मिठी नको करूस... राहु
दे तशी!
उष्ण श्वास झेलण्यास एक रात मागतो


पारिजातशी अबोल लाजरी सखी प्रिया
लाज लाजते खळीत... स्पर्श वेड लावतो


तू अशीच ये अशीच जा पहाटबावरी
हाय रात्र रात्र मी पुन्हा असाच जागतो!!!