भारलेलली खारीं वांगी

  • ५-६ मध्यम आकाराची वांगी, १ वाटी दाण्याचे कूट, १ मोठा कांदा,
  • १ चमचा आलं-लसुणाची पेस्ट, १चमचा गरम मसाला पावडर, १ चमचा धणा पावडर,
  • सुके खोबरे व ८-१० लसुण पकळ्या बारिक वाटून, (रंगासाठी लाल काश्मिरी पावडर १चमचा ),
  • २ चमचा लाल तिखट मालवणी लाल तिखट हि चालेल, मिठ, कोथंबिर , आणि फ़ोडणिसाठि तेल,
  • इत्यादि.
३० मिनिटे

सर्वप्रथम वांगी धुऊन घ्यावीत. त्यांना भरता येण्याजोगे काप करावेत. नंतर दण्याचे कुट, गरम मसाला पावडर, धणा पावडर, लाल तिखट, लसुण -खोबऱ्याचे वाटण, आलं लसुण पेस्ट, ३-४ छोटा चमचे तेल, कोथंबिर, बारीक चिरलेला कांदा (थोडा फ़ोडणिसाठी ठेऊन) बाकी सर्व  एकत्रित करावे. हा मसाला वांग्यात व्यवस्थित भरावा जेणेकरुन तो बाहेर पडणार नाही.

  शेगडीवर भांडे ठेऊन त्यात मोठा १ चमचा तेल टाकावे.  ते गरम झाल्यानंतर त्यात कांदा टाकून गुलाबी रंग येईपर्यंत भाजावा. कांदा भाजल्यावर त्यात काश्मिरी लाल पावडर टाकवी. थोडसं हलवुन पाणि टाकावे. मंद आचेवर शिजत ठेवावे‍. झाकण ठेवु नये. नाहितर तेलाचा तवंग येणार नाही.

   शिजल्यानंतर वरुन कोथंबिर पेरावी.  हि रस-भाजी पोळी, भाकरी, भात याबरोबर चांगली लगते.

हि भाजी रसभाजी व सुकी भाजी म्हणून करु शकतो.

 

हि भाजी बनवताना तेलाचा तवंग यायलाच हवा. व हि भाजी झणझणीत्अच चांगली लगते