ह्या निवड समितीत का संवाद आहे?
ही नवी नाही जुनी फ़िर्याद आहे
झेल त्यांचे सोडतो मी कौतुकाने
ही फलंदाजांस माझी दाद आहे
खेळलो नाही तरी मी मत्त होतो
माज माझा खानदानी नाद आहे
नेमकी अन बोचरी कॉमेंटरी ती
कारकीर्दीला फुकाची ब्याद आहे
काढले मजला कुणाला काय त्याचे?
का बरे इतक्या उशीरा.. वाद आहे
डाव हा आता खरा रंगात आला
दंभ माझा आजही नाबाद आहे
वैभव जोशी ह्यांच्या फ़िर्याद वर आधारित