कुटाचे लाडू

  • 2 चमचे शुद्ध तूप
  • 2 वाट्या शेंगदाणे भाजून त्यांचे केलेले कूट
  • पाऊण वाटी दळलेली साखर
  • अर्धा चमचा वेलचीपूड
१५ मिनिटे
२ जणांसाठी दिवसभर खायला

तूप थाळीत फेसायला घ्या. ते हाताच्या उष्णतेने पातळ झाले की त्यात थोडी थोडी करून दळलेली साखर घालत फेसत रहा. साखर फेसून झाल्यावर दाण्याचे कूट आणि वेलचीपूड घालून लिंबाच्या आकाराचे लाडू वळा.

फक्त 10 ते 15 मिनिटात होणारे हे उपासाचे लाडू खायचा आनंद घेण्यासाठी लगेचच करुन पहा.

आजीबाई