हिचीही मान्यता होती तिच्या माझ्या विवाहाला

हिचीही मान्यता होती तिच्या माझ्या विवाहाला
म्हणूनच शांतता होती तिच्या माझ्या विवाहाला


चला आले भिकारी रंजलेले गांजलेले हे
पुरेशी भव्यता होती तिच्या माझ्या विवाहाला


वराचा चेहरा रडका वधूचा चेहरा हसरा
न दुसरी शक्यता होती तिच्या माझ्या विवाहाला


मला झोपायचे होते तिला जागायचे होते
कशी एकात्मता होती तिच्या माझ्या विवाहाला!


तसे वाटायला नव्हतेच वाटाणे तिथे कोणी
तरी का अक्षता होती तिच्या माझ्या विवाहाला



माफीचा साक्षीदार ह्यांच्या रुढींची मान्यता होती तिच्या माझ्या विवाहाला वर आधारित ः-))