लोण्याची पोळी

  • पारीसाठी - कणिक, चवीला मीठ, मोहन
  • सारण - एक वाटी लोणी, एक वाटी भाजलेली पीठी, तीन वाट्या पीठी साखर
  • र सारण सैल वाट्ल्यास पीठीसाखर मिसळावी.
१ तास
आवडीवर अवलन्बून

कणीक मोहन व मीठ घालून पोळ्याकरिता भिजवितो त्याप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी. सारणाचे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे. कणकेच्या दीडपट सारण त्यात भरावे हलक्या हाताने पोळ्या लाटाव्या. साधारण २० पोळ्या होतात. २-३ दिवस टिकतात. आधी करून ठेवता येतात. मुलांना आवडतात.

गुळची पोळी, पुरणाची पोळी  करणे कला आहे. सवयीनी हे कला अवगत होते पुरणाची पोळी, लोण्याची पोळी हलक्या हाताने लाटाव्या लागतात तर गुळाची पोळी जरा जोर लावून लाटाव्या लागतात. 

मावशी