आला पाऊस पाऊस
जीव होई वरखाली
आठवते सारे काही
झाले जे जे गतसाली !!१!!
आला पाऊस पाऊस
खड्डे अजूनी उघडे
पालिका नी खोदकामे
असे कसे हे त्रांगडे !!२!!
आला पाऊस पाऊस
भरे उरात धडकी
जरी हासला 'विलास'
'मिठी' तशीच रडकी !!३!!
आला पाऊस पाऊस
आठवल्या बंद गाड्या
घेऊ का मी एकदोन
छान लाकडाच्या होड्या !!४!!
आला पाऊस पाऊस
आले ढग ते आभाळी
केला देवाला नवस
मुंबापूरी रे सांभाळी !!५!!
साती काळे.