शिल्पकार

संध्या खेळते फुगडी
उषेसह गगन मंडपी
कोणत्या गूढ उपक्रमी
तहान भूक हरपली?

प्राजक्त उभा प्रसन्नतेचा
अनलाच्या अनिल लहरी
सुळका भीषण पर्वताचा
करी दृढ तया निश्चयेसी


हातातील छिन्नी खोदते
मूर्ती संतत पाषाणातूनी
ध्येयाची धुंदी खुलवी
चांदणे गभस्तीच्या किरणातूनी