पुणेरी हिसका

१)  tttp://www.puneri_joshi.com/

     सूचनाः ही जोश्यांची वेबसाईट आहे.
     उपसूचनाः उगाच ईकडे तिकडे क्लिक करत बसू नये.


२)  सूचनाः दवाज्यामधे थांबून गप्पागोष्टी करू नये, ही जागा व्यवसायाची आहे  
     चर्चा करण्याचा हॉल नाही - व्यवस्थापक


३)  एकदा चितळेंच्या दुकानाला भर दुपारी आग लागली. फायर ब्रिगेडचे बंब आले, पण दुकान बंद होते. त्यांनी चितळ्यांच्या घरी फोन केला. चितळे म्हणाले "दुकान ४.०० वाजता उघडेल, तेव्हा या. आत्ता आत जाण्याचा प्रयत्न केला तर तुमचा अपमान होईल"


४)  " हे कार्यालय आहे. आत पाहण्यासारखे काही नाही. आत येऊ नये"


५)  फक्त सायकलींसाठी
     एका ओळीत दोनच
     =  =  = =
    (फक्त सभासदांसाठी)


६) मित्रमंडळ सभागृह पुणे


    * विवाहाच्या दिवशी सभागृह पूर्णपणे १००% सायं ५ वाजता रिकामे करावेच 
       लागते. याची जाणीव ठेवूनच सभागृह बुक करावे


    * लक्ष्मीपूजन किंवा इतर कोणताही कार्यक्रम दु. ३ नंतर करण्यास
        परवानगी नाही याची नोंद घ्यावी. - धन्यवाद.
    * केटरिंग सर्व्हिस रात्री १०.०० ला बंद करावी लागते.