विचित्र विश्लेषण

म.टा. मधील ही बातमी वाचलीत का? लेखकाने हा लेख जर उपरोधिकपणे लिहिला असेल तर ठीक आहे. पण जर गंभीरपणे लिहिला असेल तर मात्र खरेच अवघड आहे. हे म्हणजे "दरोडेखोर आहे, लूट मार करणे त्याचे कामच आहे. आता लुटताना एखाद्याचा जीव गेला तर त्यात त्याचा काय दोष. त्याला कशाला दुष्ट म्हणायचे" अशातला प्रकार झाला. एका वाक्यात सांगायचे झाले तर "गैरकृत्याचे समर्थन" करण्याचा प्रकार झाला. या मानसिकतेने जर आपण वागणार असू तर आपले रसातळाला जाणे निश्चित आहे.